खेळाच्या मैदानावरही कोरियाचे मैत्रीपर्वाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

हामस्टॅड (स्वीडन) - जागतिक टेबल टेनिसमधील दक्षिण आणि उत्तर कोरिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील महिलांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते; पण ही लढत झालीच नाही. त्यांनी एकमेकांशी न खेळता उर्वरित स्पर्धेत संयुक्त संघ खेळवण्याचे ठरवले. 

उत्तर आणि दक्षिण कोरियाने एकमेकांविरुद्ध उपांत्य लढत खेळण्याऐवजी संयुक्त संघ खेळवण्यास मंजुरी देण्याची विनंती केली. कोरियाच्या एकत्रित संघाने अनेक जण सुखावले असले तरी चीन नाराज झाले असेल. यापूर्वी हे १९९१ च्या स्पर्धेत घडले होते, त्या वेळी चिनी महिलांच्या जागतिक वर्चस्वास कोरियाच्या संयुक्त संघाने धक्का दिला होता. 

संयुक्त संघ खेळवण्याबाबत उत्तर आणि दक्षिण कोरियाचे टेबल टेनिस संघ, तसेच जागतिक टेबल टेनिस महासंघात त्रिपक्षीय करार झाला. जागतिक टेबल टेनिस महासंघाच्या कार्यकारिणीस हा निर्णय सांगितल्यावर त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले, असे जागतिक टेबल टेनिस महासंघाचे अध्यक्ष थॉमस वेईकार्ट यांनी सांगितले. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत संयुक्त संघ खेळवण्याबाबत दोन देशांत चर्चा सुरू आहे. यापूर्वी हिवाळी ऑलिंपिकच्या आइस महिला हॉकीत कोरियाचा संयुक्त संघ सहभागी झाला होता, तसेच उद्‌घाटन सोहळ्यात त्यांनी एकत्रित संचलनही केले होते.

मैत्रीचा हात
    कोरियाचा संयुक्त संघ होताना खेळाडूंत घट नाही
    दक्षिण कोरियाचे पाच आणि उत्तर कोरियाचे चार खेळाडू
    पदक जिंकल्यास नऊ खेळाडूंना पदक मिळणार
    पदक वितरण कार्यक्रमात दोन्ही देशांचे ध्वज फडकणार
    संघाचे नाव कोरिया असेल, पण पोशाखात बदल नसेल
    आशियाई क्रीडा स्पर्धेतही संयुक्त संघासाठी प्रयत्न
    या स्पर्धेतही उत्तर तसेच दक्षिण कोरिया स्वतंत्र कोटा कायम

Web Title: south korea & north korea friendship table tennis