भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल

पीटीआय
गुरुवार, 18 जानेवारी 2018

तौरंगा (न्यूझीलंड) - भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेत विजयी सुरवात करताना जपानचा ६-० असा सहज पराभव केला. आंतरराष्ट्रीय पदार्पणात विवेक सागर प्रसाद व दिलप्रीत सिंगने प्रत्येकी दोन गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

ब्लॅक पार्कवरील या लढतीत भारताने पहिल्या मिनिटापासून हुकूमत राखली. त्यांनी वेगवान पास करीत जपानला प्रतिआक्रमणाची संधीही फारशी दिली नाही. रुपिंदर आणि हरमनप्रीतने भारताचे अन्य गोल केले. 

बेल्जियमची न्यूझीलंडविरुद्ध हार
ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमला न्यूझीलंडविरुद्ध हार पत्करावी लागली. जागतिक क्रमवारीत तिसरे असलेले बेल्जियम क्वचितच हुकूमत राखू शकले. विश्रांतीच्या ३-३ बरोबरीनंतर बेल्जियम ४-५ पराजित झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sport news hockey india japan