६,०३२ कोटींची बोली; तरीही कोंडी कायम
मुंबई - पुढील पाच वर्षांसाठी मायदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रक्षेपण हक्कातून बीसीसीआयला विक्रमी किंमत मिळणार, हे आता निश्चित झाले आहे. दोन दिवस झाले तरी अजून लिलावच सुरू आहे. टीव्ही आणि डिजिटल या दोन्हींची एकत्रित बोली ६,०३२ कोटींपर्यंत गेली. म्हणजेच प्रत्येक सामन्यासाठी ५९ कोटी १० लाख रुपये येथपर्यंत आज थांबलेला ई-लिलाव उद्या येथूनच पुढे सुरू होणार आहे.
आधीच सर्वाधिक श्रीमंत असलेल्या बीसीसीआयसाठी देशात होणाऱ्या पुढील पाच वर्षांचा लिलाव चांगलाच फायदेशीर ठरताना दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेला आयपीएल प्रसारण हक्कांचा लिलाव स्टारने जिंकला होता. १६,३५० कोटींचा हा करार होता, म्हणजेच सुमारे ३०० सामने आणि प्रत्येक सामन्यांसाठी ते ५४ कोटी ५० लाख बीसीसीआयला देणार आहेत. अपूर्ण राहिलेल्या या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रसारणाने आताच सर्वाधिक किमतीचा विक्रम पार केला आहे.