बिंद्रा, उषाकडे परत राजीनामा द्यावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - परस्परविरोधी हितसंबंधाचा प्रश्न टाळण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने पाच खेळाडूंना राष्ट्रीय निरीक्षकपद सोडण्यास सांगितले आहे; पण कमलेश मेहता, अभिनव बिंद्रा आणि पी. टी. उषा यांनी काही महिन्यांपूर्वीच या पदाचा राजीनामा दिला आहे. 

स्वतःची अकादमी असलेल्या पाच खेळाडूंना राजीनामा देण्यास क्रीडा मंत्रालयाने सांगितले आहे. अंजू बॉबी जॉर्जची अकादमी अजून कार्यरत झालेली नाही; तर मल्लेश्वरी तिच्या पतीच्या अकादमीत कार्यरत आहे. आपली राष्ट्रीय निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे; पण आपण अकादमीशी संबंधित आहात अथवा या अकादमीत कार्यरत आहात.

परस्परविरोधी हितसंबंधांचा मुद्दा टाळण्यासाठी आपण या पदावरून दूर होणेच योग्य होईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर या पदाचा राजीनामा द्यावा, अशा आशयाचे पत्र २० मार्च रोजी पाच खेळाडूंना पाठवण्यात आले आहे.  

गतवर्षी मार्चमध्ये क्रीडा मंत्रालयाने बारा खेळांसाठी निरीक्षक नेमले होते. त्यात संजीव कुमार सिंग (तिरंदाजी), अपर्णा पोपट (बॅडमिंटन), मेरी कोम, अखिल कुमार (बॉक्‍सिंग), जगबीर सिंग (हॉकी), सोमदेव देववर्मन (टेनिस), सुशीलकुमार (कुस्ती), आय. एम. विजयन (फुटबॉल) आणि खजान सिंग (जलतरण) यांचाही समावेश होता.

सदसद्‌्विवेकबुद्धी
बिंद्राने राष्ट्रीय निरीक्षक; तसेच लक्ष्य ऑलिंपिकपदक योजनेच्या प्रमुख पदावरून यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यानंतर एका महिन्यात उषानेही राजीनामा दिला. 
खरे तर उषा, बिंद्रा; तसेच कमलेश मेहता यांनी सदसद्विवेक बुद्धीने राजीनामा दिला होता. राष्ट्रीय निरीक्षकांचा निवडीत कोणताही थेट सहभाग नसल्यामुळे अकादमी असलेले खेळाडू निरीक्षकपदासाठी अपात्र ठरत नाहीत, असे आचारसंहितेत म्हटले आहे.

Web Title: sports news Abhinav Bindra P. T. Usha