जलतरणपटू ड्रेसेलची फेल्प्सशी बरोबरी

पीटीआय
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

बुडापेस्ट - नव्वद मिनिटांत तीन सुवर्णपदके मिळविल्यानंतर अमेरिकेच्या कॅएलेब ड्रेसेल याने एका जागतिक स्पर्धेत सात सुवर्णपदके मिळविण्याच्या मायकेल फेल्प्सच्या कामगिरीशी बरोबरी केली. 

जागतिक जलतरण स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ड्रेसेलने अमेरिकेला ४ बाय १०० मीटर मिडले शर्यतीत सुवर्णपदक मिळवून देताना स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. ड्रेसेलने बटरफ्लाय प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करताना संघाचे सुवर्णपदक निश्‍चित केले. ड्रेसेलने या स्पर्धेत तीन वैयक्तिक आणि चार रिले शर्यतीची सुवर्णपदके मिळविली. फेल्प्सने अशी कामगिरी २००७ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत केली होती.

त्याच्या कामगिरीमुळे अमेरिकेला जागतिक स्पर्धेतील सर्वाधिक पदकांची कमाई करता आली. अमेरिकेने या स्पर्धेत ३८ पदके मिळविली. ड्रेसेल म्हणाला, ‘‘असे काही घडेल असे मला वाटलेच नव्हते. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आता मी छोटी विश्रांती घेणार असून, त्यासाठी पोलंड आणि स्कॉटलंड येथे जाणार आहे.’’

Web Title: sports news american caelab dressell