नव्वद मिनिटांत ड्रेसेलची तीन सुवर्णपदकांची कमाई

पीटीआय
सोमवार, 31 जुलै 2017

बुडापेस्ट (हंगेरी) - अमेरिकेच्या कॅएलेब ड्रेसेल याने एकाच सत्रात सलग तीन सुवर्णपदके पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जलतरणपटू ठरला आहे.

बुडापेस्ट (हंगेरी) - अमेरिकेच्या कॅएलेब ड्रेसेल याने एकाच सत्रात सलग तीन सुवर्णपदके पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जलतरणपटू ठरला आहे.

ड्रेसेलने अवघ्या ९० मिनिटांत तीन सुवर्णपदकांना गवसणी घातली. पुरुषांच्या ५० मीटर फ्री-स्टाईल प्रकारातील सुवर्णपदकाने ड्रेसेलच्या सुवर्ण कामगिरीला सुरवात झाली. त्याने २१.१५ सेकंदाची विश्‍व विक्रमी वेळ दिली. त्यानंतर ३३ मिनिटांनी २० वर्षीय ड्रेसेलने १०० मीटर बटरफ्लाय शर्यत ४९.८६ सेकंद वेळेसह जिंकली. त्याचा फेल्प्सने नोंदवलेला विश्‍वविक्रम शतांश चार सेकंदाने हुकला. तलावावर येऊन जेमतेम तासही उलटत नाही तो ड्रेसेल तिसऱ्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत त्याने अमेरिकेला सुवर्णपदक मिळवून दिले. अमेरिकेने ३ मिनिट १९.६० सेकंद अशी विश्‍व विक्रमी वेळ दिली. यात ड्रेसेलचा वाटा ४७.२२ सेकंदाचा राहिला.

पुरुषांची ४ बाय १०० मीटर मिडले रिले शर्यत अजून बाकी आहे. त्यामुळे ड्रेसेलच्या कामगिरीकडे नजरा असतील. त्याला मायकेल फ्लेप्सच्या सात सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी करण्यासाठी एका सुवर्णपदकाची गरज आहे.

Web Title: sports news American Caelab Dressell World Swimming Championships

टॅग्स