कश्‍यपचा सलामीला सनसनाटी विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

अव्वल मानांकित ली ह्यूनवर संघर्षपूर्ण मात

कॅलिफोर्निया - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचा विजेता पी कश्‍यप याने अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेला सनसनाटी सुरवात केली. पहिल्याच फेरीत त्याने अव्वल मानांकित ली ह्यून याचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत २१-१६, १०-२१, २१-१९ असे परतवून लावले.

यापूर्वीच्या लढतीत कश्‍यपला ह्यूनकडून तीनवेळा पराभव पत्करावा लागला होता, तर दोन लढती कश्‍यपने जिंकल्या होत्या. या स्पर्धेत कश्‍यपने १ तास तीन मिनिटांच्या लढतीनंतर ह्यूनचे आव्हान संपुष्टात आणले. ह्यूनने गेल्याच आठवड्यात कॅनडा ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. कश्‍यपची गाठ आता हंगेरीच्या जर्जेली क्राउझशी पडणार आहे. 

कश्‍यपपाठोपाठ पाचवा मानांकित समीर वर्मा यानेही जबरदस्त सुरवात केली. त्याने व्हिएतनामच्या होआंग नाम न्गुयेन याचा २१-५, २१-१० असा सहज पराभव केला. दुसरा मानांकित एच. एस. प्रणॉय याने देखील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने ऑस्ट्रियाच्या लुका रॅबेर याचे आव्हान २१-१२, २१-१६ असे मोडून काढले.  महिला एकेरीच्या लढतीत रितुपर्णा दास हिने कॅनडाच्या रशेल होंडरिच हिचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. प्रिया कुड्रावेली हिनेदेखील अमेरिकेच्या माया चेन हिचे आव्हान संपुष्टात आणले.

Web Title: sports news american open badminton competition