भारताच्या आनंदची संयुक्त आघाडी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - विश्‍वनाथन आनंदने चीनचा नवोदित वेई यि याच्याविरुद्धची लढत झटपट बरोबरीत सोडवून टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील संयुक्त आघाडी पाचव्या फेरीअखेर कायम राखली.

पांढरे मोहरे असलेल्या आनंदला वेई यि याच्या पेट्रोफ बचावात्मक पद्धतीस सामोरे जावे लागले. सुरवातीस मोहऱ्यांची अदलाबदली झाली. त्यात कोणालाही वर्चस्व लाभले नाही. अखेर दोघांनी २९ चालीनंतर बरोबरी मान्य केली. आनंदप्रमाणेच हॉलंडचा अनिष गिरी आणि अझरबैझानचा शाखरियार मेदिरॉव यांचे प्रत्येकी ३.५ गुण आहेत. 

बी. अधिबनने गतविजेत्या सो वेस्ली याला रोखले. मॅग्नस कार्लसन आणि व्लादिमीर क्रामनिक यांनी ६३ चालीनंतर बरोबरी मान्य केली.

Web Title: sports news anand chess india

टॅग्स