अंकिताला कुस्तीत ब्राँझपदक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे - भारतीय कुस्ती महासंघ आणि हरियाना राज्य सरकारने आयोजित केलेल्या शहीद भगतसिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंकिता गुंडला ६२ किलो वजनी गटात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशाच्या पूजाला अंकिताने दोन मिनिटांत दुसऱ्या फेरीत पंजाबच्या परमजित कौरला १ मिनीट १० सेकंदांत चितपट केले. मात्र, उपांत्य फेरीत तिला हरियानाच्या सरिताचा प्रतिकार करता आला नाही. बाँझपदकाच्या लढतीत तिने दिल्लीच्या अंजलीला अवघ्या २० सेकंदांत चितपट केले. तिला २ लाख ५० हजार रुपयाचे रोख पारितोषिकही मिळाले.

Web Title: sports news Ankita wrestled bronze medal