अनुप कुमार, मनजित पुन्हा भारतीय संघाबाहेर

अनुप कुमार, मनजित पुन्हा भारतीय संघाबाहेर

मुंबई - आशियाई स्पर्धेनंतर  आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य संघातूनही अनुप कुमार, मनजित चिल्लर यांना वगळण्यात आले. सराव शिबिरासाठी ४४ पुरुष आणि ४२ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

हे शिबिर काही दिवसांपूर्वीच हरियाणात सुरू झाले आहे. जसवीर, नवनीत, शब्बीर बापू यांचाही समावेश नाही. अहमदाबादला झालेल्या विश्‍वकरंडक  स्पर्धेनंतरच्या कामगिरीत अनुपचा फारसा प्रभाव पडला नव्हता. राष्ट्रीय तसेच फेडरेशन स्पर्धेतही तो यशस्वी झाला नव्हता, त्यामुळे त्याचे पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत. 

संघातील निवडीसाठी खूपच चुरस आहे. त्यातच तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कोणाचे स्थान नक्की नसते. अनुप, राकेश यांच्यासारख्या खेळाडूंकडून आम्ही शिकलो आहोत. प्रत्येकाला संघाबाहेर जावे लागते. हे आमच्याबाबतीतही घडू शकते, असे आशियाई विजेत्या संघाचा कर्णधार अजय ठाकूरने आशियाई संघ निवडीच्या वेळी सांगितले होते.

महिलांच्या संभाव्य खेळाडूंबाबत बोलायचे झाले, तर तेजस्विनी आणि ममता पुजारी यांना पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. 

दीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राचे पाच खेळाडू सराव शिबिरासाठी निवडले आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत चांगली कामगिरी केलेल्या नितीन मदनेचीही निवड झाली असती, तर जास्त आनंद झाला असता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात महाराष्ट्राचे दोन ते तीन खेळाडू असावेत, ही अपेक्षा आहे. 
- डॉ. माणिक राठोड, महाराष्ट्राचे कबड्डी मार्गदर्शक

महाराष्ट्राचे आठ खेळाडू सराव शिबिरात
संभाव्य संघात महाराष्ट्राच्या आठ खेळाडूंची निवड झाली. त्यात पाच पुरुष आणि तीन महिला आहेत. गिरीश इरनाक, नीलेश साळुंके, रिषांक देवाडिगा, सचिन शिंगाडे आणि विकास काळे या राष्ट्रीय विजेत्या संघातील खेळाडूंची निवड झाली आहे, तर अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव आणि सायली केरीपाळे या संभाव्य संघात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com