प्रचंड मेहनतीनेच मिळविले यश - अर्चना आढाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

भुवनेश्‍वर - प्रशिक्षक सुरेश काकड यांच्यावर असलेली श्रद्धा आणि प्रचंड मेहनत हे माझ्या आजपर्यंतच्या यशाचे गमक होय. कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत भारतासाठी पदकाची प्रबळ दावेदार असलेली अर्चना आढाव आपल्या नऊ वर्षांच्या ॲथलेटिक्‍स प्रवासाविषयी बोलत होती. 

पुणे येथे कस्टम विभागात कार्यरत असलेल्या २२ वर्षीय अर्चनाच्या खात्यात सध्या ज्युनिअर पातळीवरील दोन आंतरराष्ट्रीय ब्राँझपदके असली, तरी वरिष्ठ गटातील तिची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होय. 

पहिल्याच प्रयत्नात पदक जिंकून २०२०च्या ऑलिंपिक अभियानाला सुरवात करायची आहे, हा निर्धार तिने बोलून दाखविला. ती म्हणाली, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर वरिष्ठ गटात प्रथमच सहभागी होत आहे. सध्या मी नोंदवीत असलेली वेळ पाहता पदक आवाक्‍यात आहे. मात्र, स्पर्धा भारतात आहे. त्यामुळे दडपण आहेच. मात्र, पदक हातून निसटणार नाही, यासाठी तयारी केली आहे.’’ 

म्हाळुंगे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी ही तिची कर्मभुमी. आपल्या ॲथलेटिक्‍सच्या सुरवातीविषयी ती म्हणाली,‘‘सध्या मी राष्ट्रीय शिबिरात निकोलाय सस्नेरेव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असले, तरी सुरेश काकड यांनीच मला घडविले. एक महिन्याची असताना वडील गेले. घरची परिस्थीती बेताची, त्यात आई व दोन बहिणींची आठवण आली की प्रत्येक वेळी काकड सर मानसिक आधार द्यायचे. आता त्यांची बदली नाशिक येथे झाल्याने मला राष्ट्रीय शिबिरात यावे लागले.’’ पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सरावात खंड पडून चालणार नाही, असे सांगणाऱ्या अर्चनाने त्यासाठी शासनाने काकड सरांना पुन्हा पुण्यात आणावे अशी विनंती देखील केली. 

तीन वर्षापूर्वी विश्‍व ज्युनिअर स्पर्धेच्या वेळी तिच्या पायाला दुखापत झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नव्हते. पुन्हा एकदा नैराश्‍य आले होते. मात्र, या वेळीही त्यातून बाहेर पडली. 

अखेर मे महिन्यात पतियाळा येथे फेडरेशन करंडक स्पर्धेत यश मिळाले. आता विद्यमान आशियाई विजेती टिंटू लुकाला पराभूत करण्याचा विश्‍वास आहे आणि सर्वकाही योजनेप्रमाणे घडले तर लंडन येथे होणाऱ्या विश्‍व स्पर्धेसाठीची पात्रताही गाठेल, असा विश्‍वास तिने बोलून दाखविला. 

Web Title: sports news Archana adhav