आयटीएफ टेनिस स्पर्धेत अर्जुन कढे उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कोईमतूर - आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या शशीकुमार मुकुंद याने विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने अर्जुन कढेवर ६-३, ६-४ अशी मात केली. शशीचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.

कोईमतूर - आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या शशीकुमार मुकुंद याने विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने अर्जुन कढेवर ६-३, ६-४ अशी मात केली. शशीचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.

गेल्या आठवड्यात त्याने चेन्नईत कॉलीन वॅन बीमला हरवून विजेतेपद मिळविले होते. तेव्हा त्याने उपांत्य फेरीत अर्जुनला हरविले होते. अर्जुनने कारकिर्दीत एकेरीमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने या स्पर्धेतून दहा गुणांची कमाई केली. गेल्या दोन आठवड्यांत चेन्नईतील स्पर्धांतून त्याने १२ गुण कमावले होते. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या अर्जुनसाठी एकूण स्पर्धा उल्लेखनीय ठरली. कॉलीनवरील विजयासह त्याने क्षमतेची चुणूक दाखविली.

Web Title: sports news Arjun kadhe ITF Tennis Championships

टॅग्स