एका महिन्याच्या आत निवडणुका घ्या

पीटीआय
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स संघटनेला (एमएए) एका महिन्याच्या आत नव्याने निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच वेळी महासंघाने पुड्डुचेरी, मणिपूर, नागालॅंड यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महासंघाच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे निर्णय घेण्यात आले. ॲथलेटिक्‍सच्या काहीच कार्यक्रम न घेतल्याने महासंघाने पुड्डुचेरी, मणिपूर, नागालॅंड यांना कायमस्वरूपी निलंबित केले, तर वार्षिक बैठकीस गैरहजेरी लावल्याने पंजाब संघटनेस तीन महिन्यांसाठी निलंबित केले. 

महाराष्ट्रात ॲथलेटिक्‍सचा विकास करण्यात राज्य ॲथलेटिक्‍स संघटना कमी पडत असल्याचे सांगून, महासंघाचे अध्यक्ष आदिल  सुमारीवाला यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स संघटनेस (एमएए) पुढील कारवाई टाळण्यासाठी एका महिन्याच्या आत निवडणुका घेण्याच्या  सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हेच राज्य संघटनेचेही अध्यक्ष आहेत. सध्या महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स संघटनेवर न्यायालयीन खटला सुरू असल्यामुळे सध्या तरी राज्य संघटनेला निवडणूक घेणे कठीण दिसत असल्याची चर्चा महासंघाच्या या निर्णयानंतर राज्यात सुरू  होती.

महासंघाने घेतलेल्या निर्णयाबाबत सुमारीवाला म्हणाले,‘‘पुड्डुचेरी, मणिपूर, नागालॅंड येथे ॲथलेटिक्‍सचा कुठलाच कार्यक्रम होत नाही. वारंवार सुचना करून त्यांनी आपल्या राज्यात ॲथलेटिक्‍सच्या प्रसारास सुरवात केली नाही.  त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. उत्तर विभागीय स्पर्धेच्या आयोजनाबाबत पंजाब ॲथलेटिक्‍स संघटनेविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. शिवाय ते वार्षिक बैठकीसही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.’’

या संघटनांना निलंबित करण्यात आले असले, तरी त्यांच्या जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान होणार नाही याची काळजी महासंघाने घेतली आहे. विशाखापट्टणम येथे २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत या जिल्ह्यातील खेळाडूंना महासंघाच्या छत्राखाली सहभागी होता येणार आहे. 

बैठकीत घेण्यात आलेले अन्य निर्णय
राज्य संघटनांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता रहावी या हेतूने घटनेचा मसुदा तयार करणे
राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यास टाळाटाळ करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय निवड चाचणीस अपात्र
राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष निश्‍चित
राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून महासंघाच्या स्थानिक कार्यक्रमास मंजुरी

Web Title: sports news Athletics