त्सोंगाचा झुंजार विजय

पीटीआय
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मेलबर्न - फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीज त्सोंगाने ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान अबाधित राखताना कॅनडाचा आव्हानवीर डेनिस शापोवालोव याला ३-६, ६-३, १-६, ७-६ (४), ७-५ असे हरविले. निर्णायक सेटमध्ये त्याने २-५ अशी पिछाडी भरून काढली. त्सोंगा १५व्या, तर शापोवालोव ५१व्या स्थानावर आहे. शापोवालोवची नव्या पिढीतील प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये गणना होते. तीन तास ३७ मिनिटे चाललेल्या लढतीत १८ वर्षांच्या शापोवालोवचे बहुतांश वेळ वर्चस्व होते. अमेरिकन ओपनमध्ये त्याने त्सोंगालाच हरवून नाव कमावले होते. ५-३ अशा स्थितीस त्याला फक्त सर्व्हिस राखण्याची गरज होती; पण त्याच वेळी त्सोंगाने प्रतिआक्रमण रचले.

मेलबर्न - फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीज त्सोंगाने ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान अबाधित राखताना कॅनडाचा आव्हानवीर डेनिस शापोवालोव याला ३-६, ६-३, १-६, ७-६ (४), ७-५ असे हरविले. निर्णायक सेटमध्ये त्याने २-५ अशी पिछाडी भरून काढली. त्सोंगा १५व्या, तर शापोवालोव ५१व्या स्थानावर आहे. शापोवालोवची नव्या पिढीतील प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये गणना होते. तीन तास ३७ मिनिटे चाललेल्या लढतीत १८ वर्षांच्या शापोवालोवचे बहुतांश वेळ वर्चस्व होते. अमेरिकन ओपनमध्ये त्याने त्सोंगालाच हरवून नाव कमावले होते. ५-३ अशा स्थितीस त्याला फक्त सर्व्हिस राखण्याची गरज होती; पण त्याच वेळी त्सोंगाने प्रतिआक्रमण रचले. त्सोंगा म्हणाला, ‘‘अखेरच्या गुणापर्यंत संघर्ष करीत राहणे मला आवश्‍यक होते. डेनिस जिंकण्याच्या योग्यतेचा होता, पण मी धैर्याने खेळ केला.’

वॉझ्नीयाकीची झुंज
द्वितीय मानांकित कॅरोलीन वॉझ्नीयाकीने ११९व्या स्थानावरील क्रोएशियाच्या याना फेटचे आव्हान ३-६, ६-२, ७-५ असे परतावून लावले. निर्णायक सेटमध्ये ती १-५ अशी पिछाडीवर होती. यानाच्या सर्व्हिसवर तिने दोन मॅचपॉइंट वाचविले. त्यानंतर तिने सलग सहा गेम जिंकले. हा सामना दोन तास ३१ मिनिटे चालला.

बेलिंडा पराभूत
गतउपविजेत्या व्हीनस विल्यम्सला हरविलेल्या स्वित्झर्लंडच्या बेलींडा बेन्चीचला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या थायलंडच्या लुक्‍सिका कुमखुमने तिला ६-१, ६-३ असे गारद केले. लुक्‍सिका २४ वर्षांची असून जागतिक क्रमवारीत १२५व्या क्रमांकावर आहे. तिने एक तास १८ मिनिटांत सामना जिंकला. 

इतर महत्त्वाचे निकाल (दुसरी फेरी) ः पुरुष एकेरी ः रॅफेल नदाल विवि लिओनार्डा मायर ६-३, ६-४, ७-७ (७-४). ग्रिगॉर दिमीत्रोव विवि मॅकेंझी मॅक्‍डोनाल्ड ४-६, ६-२, ४-६, ६-०, ८-६. नीक किर्गीऑस विवि व्हिक्‍टर ट्रॉयकी ७-५, ६-४, ७-६ (७-२). मरीन चिलीच विवि जोओ सौसा ६-१, ७-५, ६-२. महिला एकेरी ः एलिना स्विटोलीना विवि कॅटरीना सिनीयाकोवा ४-६, ६-२, ६-१.

Web Title: sports news Australian Open tennis