आशियाई बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा ताकदवान संघ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - गतवर्षीच्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीतील प्रवेश थोडक्‍यात हुकलेल्या भारताने यंदाही ताकदवर संघ निवडला आहे. यंदाची आशियाई बॅडमिंटन स्पर्धा मलेशियात ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.

भारतीय संघात ऑलिंपिकची रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझ विजेत्या साईना नेहवाल, तसेच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानी असलेल्या किदांबी श्रीकांत आणि १० व्या क्रमांकाच्या एच. एस. प्रणॉय यांचा समावेश आहे. श्रीकांत आणि प्रणॉय यांना साईप्रणीत आणि समीर वर्माची साथ असेल. भारतीय पुरुष संघ जगतिक क्रमवारीत तिसरा आहे. 

गतवर्षी भारताने सिंगापूरचा ४-१ असा पराभव करून शानदार सुरवात  केली होती; गटातील दुसऱ्या सामन्यात कोरियाकडून १-४ अशी हार झाल्यामुळे गटात दुसरे स्थान मिळाले. बाद फेरीत थायलंडकडून पराभव झाल्यामुळे उपांत्य फेरीतील प्रवेश हुकला होता.

संघ - पुरुष एकेरी - किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणोय, साईप्रणीत, समीर वर्मा. महिला एकेरी - पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, कृष्णा प्रिया, ऋत्विका गाडे. पुरुष दुहेरी - सात्विक साईराज-चिराग शेट्टी. मनू अत्री-सुमेध रेड्डी. श्‍लोक रामचंद्रन- एम. आर. अर्जुन महिला दुहेरी - अश्‍विनी पोनाप्पा-सिक्की रेड्डी, प्राजक्ता सावंत-संयोगिता. रितुपर्ण दास-मिथिला.

Web Title: sports news badminton