सिंधूसह कश्‍यप, समीर, साई प्रणीतचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सोल - जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या पी. व्ही. सिंधूसह भारताच्या पी. कश्‍यप, समीर वर्मा आणि बी. साई प्रणीत यांनी कोरियन बॅडमिंटन स्पर्धेत विजय मिळविला. मात्र, पुरुष विभागात भारताचे मुख्य आशास्थान असलेल्या एच, एस. प्रणॉयला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 

जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेनंतर प्रथमच कोर्टवर उतरताना सिंधूने हाँगकाँगच्या न्गन यी चेऊंग हिचा २९ मिनिटाला २१-१३, २१-८ असा पराभव केला. दोन आठवड्यांपूर्वी जागतिक स्पर्धेत सिंधूला चेऊंगने तीन गेमपर्यंत झुंजवले होते. पण, या वेळी सिंधूने तिला प्रतिकाराची संधीच मिळू दिली नाही. 

पुरुष एकेरीत पी. कश्‍यपनेही अगदी सहज मिळविला. त्याने तैवानच्या सू जेन हाओ याचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. या दोघांखेरीज बी. साई प्रणित आणि समीर वर्मा यांनी देखील सफाईदार विजय मिळविला. 

या सगळ्यात एच. एस. प्रणॉयला पहिल्याच फेरीत स्विकारावा लागलेला पराभव भारतासाठी सर्वांत धक्कादायक होता. सहाव्या मानांकित न्ह का लाँग अंगूने तीन गेमच्या लढतीत प्रणॉयचे आव्हान २१-१७, २१-२३, २१-१४ असे संपुष्टात आणले. 

अन्य निकाल - पुरुष एकेरी -  समीर वर्मा वि.वि. टॅनोन्गसाक साएन्सोम्बून्सूक २१-१३, २१-२३, २१-९, बी. साई प्रणीत वि.वि. हू यून २१-१५, २१-१०, केंटा निशिमोटो वि.वि. सौरभ वर्मा १८-२१, २१-१३, २१-१९, दुहेरी (पुरुष) - एस. रंकीरेड्डी-चिराग शेट्टी वि.वि. ली शेंग मु-लिन चिया यु २१-९, २२-२४, २१-१२, चुंग युई सेऑक-किम डुक यंग वि.वि. मनु अत्री-बी. सुमीथ रेड्डी २१-११, २१-१०, महिला ः फिए चो सूंग-जिंग यी टी वि.वि. अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी १९-२१, २१-१३, २१-१७ मिश्र दुहेरी - टॅंग चून मान-त्से यिंग सुएट वि.वि. एस. रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा २१-१८, २१-१९.

Web Title: sports news badminton competition