निकिता, मान्या, आदिती दुसऱ्या फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - अखिल भारतीय सबज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या निकिता जोसेफ, मान्या अवलानी १३ व १५ वर्षे या दोन्ही गटांच्या एकेरीत दुसरी फेरी गाठली. ही स्पर्धा तमिळनाडूत तिरपूर येथे सुरू आहे. आदिती साधनकरनेही १५ वर्षे गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. याच गटात सई काळे, रिया हब्बू, रुचा सावंत यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुषटात आले. 

निकिता जोसेफला महाराष्ट्राच्याच प्रेरणा अल्वेकरकडून पुढे चाल मिळाली. दुसऱ्या फेरीत तिची लढत कर्नाटकच्या रितू शहाविरुद्ध होईल. आदिती साधनकरने पुड्डुचेरीच्या अग्नॅस स्वप्नाला २१-१६, २१-१५ असे नमविले. आता तिच्यापुढे उत्तराखंडच्या दिव्यांशी जोशीचे आव्हान आहे. मान्या अवलानी नशिबवान ठरली. अव्वल मानांकित गुजरातची तस्नीम मीर दाखल न झाल्याने मान्याला विजयी घोषित करण्यात आले. 

१३ वर्षे एकेरीत द्वितीय मानांकित निकिता जोसेफने आंध्रच्या पी. लाहिरीचे आव्हान २१-१७, २१-१३ असे मोडित काढले.

Web Title: sports news badminton competition