पंचांनीच सर्व्हिस करून दाखवावी - ली चांेग वेई

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

क्वालालंपूर - ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपासून अमलात येणाऱ्या सर्व्हिसच्या नव्या नियमांवर जगातील अव्वल खेळाडूंनी टीका करण्यास सुरवात केली आहे. माझी चूक झाल्याचे सांगितल्यास पंचांनाच सर्व्हिस कशी करावी, हे विचारणार आहे, असे मत जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या ली चांेग वेई याने व्यक्त केले आहे. 

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा १४ मार्चपासून सुरू होईल. त्यात सर्व्हिसचा नवा नियम अमलात येणार आहे. त्यानुसार सर्व्हिस करताना शटलकॉक जमिनीपासून १.१५ मीटरपेक्षा (३.८ फूट) कमी अंतरावर असण्याचे बंधन घालण्यात आले आहे. उंच खेळाडूंसाठी हा नियम त्रासदायक आहे. 

जागतिक क्रमवारीत दुसरा असलेला ली चाँग वेई हा १.७२ मीटर उंच आहे; पण तरीही तो अव्वल १० खेळाडूंत सर्वांत कमी उंचीचा आहे. त्याने या सर्व्हिस नियमास लक्ष्य केले आहे. ‘जागतिक बॅडमिंटन महासंघाने सर्व्हिसचा हा नियम लहान स्पर्धांत अमलात आणायला हवा होता. आता खेळात बदल करावेच लागतील. ऑल इंग्लंड स्पर्धेत खेळताना माझ्याकडून चूक झाली, तर पंचांनाच सर्व्हिस नेमकी कशी करायची हे दाखवण्यास सांगणार आहे’, असे त्याने सांगितले. 

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन याने या नियमाची काही दिवसांपूर्वी थट्टा  उडवली होती. तो १.९४ मीटर उंच आहे. त्यात त्याने गुडघ्यांवर पाठीमागच्या बाजूला वाकत सर्व्हिस करीत असल्याचे; तसेच गुडघ्यावर बसून सर्व्हिस करीत असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. 

भारताची दुहेरीतील अव्वल खेळाडू सिक्की रेड्डी हिने जर्मन ओपन स्पर्धेत नव्या नियमानुसार तिची सर्व्हिस सदोष ठरवल्यामुळे सिक्की संतापली आणि तिने ट्‌विट करीत आपले काय चुकले, अशी विचारणा केली आहे. 

Web Title: sports news badminton Lee Chenge Wei