जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला चौथे मानांकन

पीटीआय
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मुंबई - रिओ ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत चौथे मानांकन देण्यात आले आहे; तर दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला किदांबी श्रीकांत आठवा मानांकित आहे. ही स्पर्धा ग्लासगो येथे २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. जागतिक स्पर्धेची मानांकन क्रमवारी निश्‍चित करताना ऑगस्टच्या सुरवातीस म्हणजेच ३ ऑगस्टला असलेले जागतिक मानांकन लक्षात घेण्यात आले.

या क्रमवारीनुसार दक्षिण कोरियाचा सॉन वॅन हो व जपानची अकेन यामागुची यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे पाच वेळा जागतिक स्पर्धा जिंकलेल्या लीन दान याला सातवे मानांकन लाभले आहे. भारतीयांत महिला एकेरीत अपेक्षेप्रमाणे सिंधू व साईना मानांकन क्रमवारीत आहेत; पण अव्वल १० मध्ये केवळ सिंधू व श्रीकांतच आहेत.

भारतीयांचे स्थान : पुरुष एकेरी ः ८) किदांबी श्रीकांत, १३) अजय जयराम, १५) बी. साई प्रणीत. महिला एकेरी ः ४) पी. व्ही. सिंधू, १२) साईना नेहवाल मिश्र दुहेरी ः १५) प्रणव जेरी चोप्रा - एन. सिक्की रेड्डी

Web Title: sports news badminton pv sindhu