फ्रेंच सुपर सीरिजमध्ये श्रीकांत, सिंधूचीही आगेकूच

पीटीआय
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पॅरिस - संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत सर्वाधिक पसंती असलेल्या भारताच्या किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांनी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपली आगेकूच सुरू केली. पहिल्या फेरीच्या लढतीत पुरुष एकेरीत श्रीकांतचा प्रतिस्पर्धी जर्मनीच्या फॅबिआन रॉथ याने पहिल्याच गेमला ०-३ अशा पिछाडीवर असताना माघार घेतली. त्याची गाठ आता हाँगकाँगच्या वोंग विंग की व्हिन्सेंट याच्याशी पडणार आहे.  महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू हिने स्पेनच्या बेआर्टिझ कोरालेस हिचे आव्हान २१-१९, २१-१८ असे परतवून लावले. दुसऱ्या फेरीत तिची गाठ जपानच्या सायाका ताकाहाशी हिच्याशी पडणार आहे. पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत पी.

पॅरिस - संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत सर्वाधिक पसंती असलेल्या भारताच्या किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांनी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपली आगेकूच सुरू केली. पहिल्या फेरीच्या लढतीत पुरुष एकेरीत श्रीकांतचा प्रतिस्पर्धी जर्मनीच्या फॅबिआन रॉथ याने पहिल्याच गेमला ०-३ अशा पिछाडीवर असताना माघार घेतली. त्याची गाठ आता हाँगकाँगच्या वोंग विंग की व्हिन्सेंट याच्याशी पडणार आहे.  महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू हिने स्पेनच्या बेआर्टिझ कोरालेस हिचे आव्हान २१-१९, २१-१८ असे परतवून लावले. दुसऱ्या फेरीत तिची गाठ जपानच्या सायाका ताकाहाशी हिच्याशी पडणार आहे. पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत पी. कश्‍यपला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या ॲन्थोनी सिनीसुका गिनटिंग याने कश्‍यपचा २१-२३, २१-१८, २१-१७ असा पराभव केला.

पुरुषांच्या दुहेरीत सत्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजयी सुरुवात केली. त्यांनी फ्रान्सच्या बॅस्टिअन कर्साउडी आणि ज्युलियन मैओ जोडीचे आव्हान २१-१२, २१-१४ असे परतवून लावले. महिलांच्या दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनीदेखील पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. त्यांनी इंग्लंडच्या जेनी मूर-व्हिक्‍टोरिया विल्यम्स जोडीचे आव्हान २१-१२, २१-१२ असे २४ मिनिटांत संपुष्टात आणले. पुरुष दुहेरीतील भारताची मनू अत्री-बी. सुमीत रेड्डी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. रशियाच्या व्लादिमीर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडीने त्यांचा २१-११, २१-१३ असा पराभव केला.

Web Title: sports news badminton Srikanth Kidambi