भारताच्या श्रीकांत, प्रणॉयची विजयी सुरवात

पीटीआय
गुरुवार, 15 जून 2017

जकार्ता - भारताच्या एच. एस. प्रणॉय आणि के. श्रीकांत यांनी इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून पुरुष एकेरीत विजयी सुरवात केली. दुहेरीच्या लढतीत भारतीय जोड्यांना अपयश आले.

जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानावर असणाऱ्या प्रणॉय याने सुरेख खेळाचे प्रदर्शन करताना अँथोनीचा २१-१३, २१-१८ असा पराभव केला. सिंगापूर आणि थायलंड अशा लागोपाठ दोन स्पर्धा जिंकणाऱ्या बी. साईप्रणित याला पहिल्याच फेरीत कोरियाच्या सोन वॅन हो याने १४-२१, १८-२१ असे सहज पराभूत केले. ही लढत ४० मिनिटे चालली. के. श्रीकांत याने हाँगकाँगच्या वाँग विंग याचे कडवे आव्हान २१-१५, १७-२१, २१-१६ असे परतवून लावले. 

पुुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना फजर अल्फिआन आणि महंमद आर्दिआंतो जोडीकडून ९-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या गिआन फित्रीआनी-नड्या मेलाटी जोडीने अश्‍विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचा १९-२१, २१-१९, २१-१३ असा पराभव केला.

Web Title: sports news badmiton K. Srikanth H.S. Prannoy