बीसीसीआयची क्रीडामंत्र्यांशी चर्चा

पीटीआय
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली - क्रिकेटपटूंच्या उत्तेजक चाचणीसाठी ‘नाडा’चा दबाव आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासंदर्भात बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांची आज बुधवारी भेट घेतली. या दोन्ही विषयांवर कोणताही ठोस निर्णय झालेला नसला, तरी क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांचा आदर ठेवून बीसीसीआय भविष्यात निर्णय घेईल, याचे संकेत मिळाले.

राष्ट्रीय उत्तेजकद्रव्यविरोधी संस्था (‘नाडा’) भारतीय क्रिकेटपटूंच्या उत्तेजक चाचणीसाठी आग्रही आहे; पण बीसीसीआय त्यांची मागणी धुडकावत आहे. डिसेंबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. क्रीडामंत्री राठोड यांच्याबरोबरच्या आजच्या बैठकीनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयकडून मुख्य कार्यवाही अधिकारी राहुल जोहरी आणि सरव्यवस्थापक (प्रशासन आणि क्रिकेट सुधारणा) रत्नाकर शेट्टी हेसुद्धा उपस्थित होते. ४५ मिनिटे ही बैठक चालली. ‘वाडा’ आणि ‘नाडा’ हे बैठकीतील प्रमुख मुद्दे असले, तरी भविष्यात पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही? या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे समजते.

राठोड यांच्याबरोबरची ही बैठक औपचारिक होती. राठोड यांनी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेणार होतो. ही भेट आज प्रत्यक्षात झाली, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्याचा करार झाला असला, तरी सीमेपलीकडून दहशतवाद संपत नाही तोपर्यंत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यावर बीसीसीआय आणि सरकार ठाम आहे. आता पुढील काळात आयसीसी कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धा नियोजन करत आहे. यामध्ये प्रत्येक देश एकमेकांविरुद्ध आपल्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या देशात खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा प्रश्‍न उभा राहिल्यास काय करावे? या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: sports news bcci cricket sport minister