बाइक रेसिंगमध्ये  जेके-सुझुकी मालिका

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

नवी दिल्ली - जेके टायरने देशातील रेसिंगला चालना देण्यासाठी आणखी एका मालिकेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय रेसिंग मालिकेत सुझुकी जिक्‍सर करंडकाचा समावेश झाला आहे.

जेके टायर्सचे रेसिंगप्रमुख संजय शर्मा यांनी सांगितले, की कार्टिंगपासून सिंगल सीटर कारपर्यंत आम्ही विविध मालिकांचे आयोजन केले. आता आम्ही बाइक रेसिंगकडे वळलो आहोत. आम्हाला चॅंपियन बायकर्स घडवायचे आहेत. त्यासाठी १२ ते १६ व १६ वर्षांवरील असे दोन वयोगट केले आहेत. लहान वयोगट रेड बुल मालिकेसाठी पात्रता निकष राहील. मोठ्या वयोगटात २५ रायडर्सची निवड होईल.

या मालिकांमध्ये अधिकाधिक देशातील अधिकाधिक रायडर्सना संधी मिळावी, म्हणून चार विभागांत स्पर्धा होईल. दक्षिणेत बंगळूरला चार जून, पूर्वेत एजॉलला १० जून, पश्‍चिमेत पुण्याला १८ जून, तर उत्तरेत दिल्लीमध्ये २५ जून रोजी निवड चाचणी शर्यती होतील.

सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक सातोशी उचिदा यांनी सांगितले, की बाइक रेसिंग हा आकर्षक खेळ आहे. प्रामुख्याने तरुणवर्गात त्याची लोकप्रियता वाढत आहे. जेके टायर्सचे योजनाबद्ध उपक्रम आणि रेसिंगवरील निष्ठा पाहता आम्ही या मालिकेसाठी उत्सुक आहोत.

Web Title: sports news bike racing