निवड समितीने बांधली बोपण्णा-पेसची मोट

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

नवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची विनंती भारतीय टेनिस निवड समितीने रविवारी फेटाळून लावली.त्याचबरोबर अनुभवी लिअँडर पेस याला भारतीय संघात पुन्हा स्थान दिले. 

नवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची विनंती भारतीय टेनिस निवड समितीने रविवारी फेटाळून लावली.त्याचबरोबर अनुभवी लिअँडर पेस याला भारतीय संघात पुन्हा स्थान दिले. 

एकूणच निवड समिती आणि टेनिस संघटना यांनी या लढतीच्या निमित्ताने दुहेरीत बोपण्णा-पेस यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया-ओशियाना गट १ मधील ही लढत चीनमध्ये तिआनजीन येथे होणार आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच उझबेकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत ४४ वर्षीय पेसला वगळण्यात आले होते. पाठोपाठ झालेल्या कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटाच्या ‘प्ले-ऑफ’ लढतीपासूनही त्याला दूर ठेवण्यात आले होते. डेव्हिस करंडक स्पर्धेत दुहेरीत सर्वाधिक ४२ विजय मिळविणाऱ्या निकोला पिएट्रांजेलीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असून, चीन विरुद्ध हा विक्रम मागे टाकण्याची त्याला संधी मिळणार आहे. 

जागतिक टेनिस क्रमवारीत पुन्हा पहिल्या पन्नास जणात स्थान मिळाल्यावरच पेसला डेव्हिस करंडक संघातील समावेशाचा मार्ग सुकर झाला होता. त्याचबरोबर गेल्या वर्षी जागतिक गटातील प्ले-ऑफच्या लढतीत दुहेरी जोडीवर भारतीय टेनिस संघटना नाराज असल्याचेही  बोलले जात होते. खेळाडूंमध्ये काही हेवेदावे असतील, तर ते परस्पर सामंजस्याने सोडवण्यात यावे आणि संघाचे हित लक्षात घेऊन योग्य संघ निवडावा असे स्पष्ट आदेश टेनिस संघटनेने निवड समितीला दिले होते. त्याचवेळी पेसने यापूर्वी देशासाठी दिलेल्या  योगदानाचा जरूर विचार व्हावा. त्याला असे डावलून 
चालणार नाही. 

शेवटी कर्णधारासमोर सर्वोत्तम पर्याय ठेवणे हे निवड समितीचे काम आहे. त्यानंतर अंतिम संघ निवडणे हे त्याचे काम असेल, असेही टेनिस संघटनेचा एक पदाधिकारी म्हणाला होता. पेसला स्थान देताना पूरवा राजाला वगळण्यात आले असून, दिवीज शरणला राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे. 

पेस खेरीज संघात युकी भांब्री, रामकुमार रामनाथन, सुमीत नागल, रोहन बोपण्णा, दिवीज शरण (राखीव) यांचाही समावेश करण्यात आला आहे.

बोपण्णाची विनंती फेटाळली
रोहन बोपण्णाने चीनविरुद्धच्या लढतीसाठी विश्रांतीची मागणी केल्याचे महेश भूपतीने टेनिस संघटनेला सांगितले होते. पेसबरोबर खेळण्याची आपली इच्छा नसल्याचे थेट न सांगता त्याने पेसला विक्रमी कामगिरी करण्यासाठी संधी देण्यात यावी असे सुचविले होते. पण, टेनिस संघटनेकडून आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर निवड समितीने भूपती आणि बोपण्णा यांचे कुणाचेच म्हणणे विचारात घेतले नाही. त्यांनी बोपण्णासह दुहेरीसाठी पेसचीच निवड केली. त्याच वेळी अंतिम संघ निवडण्याची जबाबदारी कर्णधाराची राहील, असे सांगून चेंडू महेश भूपतीच्या कोर्टात ढकलला. 

बोपण्णाच्या साथीत खेळण्यास माझी काहीच हरकत नाही. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. जागतिक मानांकनही सुधारले. मी रोहनच्या साथीत खेळण्यास उत्सुक आहे. खेळाडू म्हणून रोहन गुणवान आहे आणि मी त्याचा आदर करतो.
- लिअँडर पेस

Web Title: sports news Bopanna-Pace