बॉक्सिंगमध्ये शिवासह भारताला पाच सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नवी दिल्ली - भारताच्या शिवा थापा आणि मनोज कुमार यांच्यासह पाच बॉक्‍सिंग खेळाडूंनी चेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या ४८व्या आंतरराष्ट्रीय ग्रॅंड प्रिक्‍स बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची  कमाई केली. 

जागतिक स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता शिवाने ६० किलो, तर माजी राष्ट्रकुल विजेत्या मनोजकुमारने ६९ किलो, अमित फांगल (५२ किलो), गौरव भिदुरी (५६ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलो वरील) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. कविंदर बिश्‍त (५२ किलो) आणि मनीष पन्वर (८१ किलो) यांना रौप्य, तर सुमीत संगवान (९१ किलो) याला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. 

स्पर्धेथील ४९ किलो वजनी गटातील अंतिम लढत कविंदर आणि अमित फांगल या भारतीय खेळाडूंमध्येच झाली. यामध्ये अमितने ३-२ अशी बाजी मारली. त्यानंतर गौरवने पोलंडच्या इवानोव जारोस्लाव याच्यावर अगदीच एकतर्फी ५-० असा विजय मिळविला.

आशियाई स्पर्धेत रौप्यपदकविजेत्या शिवाने देखील आपले वर्चस्व कायम  राखले. त्याने स्लोव्हाकियाच्या फिलिप मेझारोस याच्यावर सरळ ५-० अशी मात केली. या विजयाने आपल्याला पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी आत्मविश्‍वास मिळाला असे शिवाने सांगितले. मनोज कुमार याने स्थानिक खेळाडू डेव्हिड कॉटच याच्याविरुद्ध ५-० असा कौल पंचांकडून मिळविला. सतीशकुमारने ९१ किलो वरील वजनी गटात मात्र जर्मनीच्या मॅक्‍स किल्लरचा प्रतिकार परतवून लावला. 

भारताला सुवर्णपदकाचा षटकार ठोकण्याची चांगली संधी होती. मात्र, मनीषला जर्मनीच्या इब्रागिम बाझुएवविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक स्पर्धेत खेळणाऱ्या भारताच्या सात बॉक्‍सिंग खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. या सातही खेळाडूंनी या स्पर्धेत पदकाची कमाई केली.

Web Title: sports news boxing india