जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताचे सात बॉक्‍सर दुसऱ्या फेरीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

मुंबई - जागतिक स्पर्धेत छान सुरवात करताना भारताच्या सात बॉक्‍सरनी पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. भारताच्या चौघांनी पहिल्या फेरीत विजय मिळविला; तर तिघांना पहिल्या फेरीत बाय होता. सतीश कुमारचा पराभव हेच भारतासाठी अपयश ठरले. 

जर्मनीत सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम बॉक्‍सर विकास क्रिशन यादव याला मिडलवेट गटात (७५ किलो) तिसरे मानांकन आहे; तर शिवा थापा लाईटवेट गटात (६० किलो) चौथा मानांकित आहे. सुनील संगवान याला ९१ किलो गटात सहावे मानांकन आहे. या तिघांना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. 

अमित फांगल (४९ किलो), गौरव बिधुरी (५६ किलो), मनोज कुमार (६९ किलो), कविंदर बिश्‍त  (५२ किलो) यांनी पहिल्या फेरीची लढत जिंकली आहे.

मनोजने मोल्डोवाच्या वासिली बेलोऊस याचा ३-२ असा पराभव केला. त्याची आता लढत २०१३ च्या जागतिक ब्राँझविजेत्या गॅब्रिएल मॅएस्त्रे याच्याविरुद्ध होईल. व्हेनेझुएलाच्या बॉक्‍सरला चौथे मानांकन आहे.

कविंदरने जपानच्या ऱ्यासाई बॅबा याला फ्लायवेट गटात ३-२ असे नमवले. त्याची लढत आता या स्पर्धेत दोनदा पदक जिंकलेल्या महंमद फिसी याच्याविरुद्ध होईल.  सतीश कुमार ९१ किलोपेक्षा जास्त वजनी गटात दोन वेळच्या जगज्जेत्या महंमद्रासुल माजिदॉव याच्याविरुद्ध ०-५ असा पराजित झाला.

Web Title: sports news boxing india