मेवेदरचा 50-0 ने विक्रमी विजय; चाळिसाव्या वर्षी नेत्रदीपक पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेगर यांच्यात झालेल्या या लढतीकडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले होते.

लास वेगास : निवृत्तीनंतर वयाच्या चाळिसाव्या वर्षी पुनरागमन करत रणांगणात उतरलेल्या मुष्टियोद्धा फ्लॉईड मेवेदर याने 50 - 0 अशा फरकाने एकांगी जबरदस्त विजय मिळवत विक्रमी कामगिरी केली. हेवीवेट प्रकारातील रॉकी मार्सियानो याचा 49 - 0 चा विक्रम त्याने मागे टाकला. 

मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेगर यांच्यात झालेल्या या लढतीकडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले होते. मॅकग्रेगर सोबतची ही मेगाफाईट जिंकत मेवेदरने विक्रम प्रस्थापित केला. एकही पॉइंट न गमावता टेक्निकल नॉकआऊटच्या माध्यमातून मॅकग्रेगरला दहाव्या फेरीत त्याचा दारुण पराभव केला. 

मॅकग्रेगर हा मिश्र मार्शल आर्ट्समधील चँपियन असून, तो व्यावसायिक मुष्टियुद्ध स्पर्धेत पदार्पण करत होता. त्याने मेवेदरला प्रत्युत्तर दिले असते तर तो मेवेदरचा सर्वांत मोठा पराभवही ठरला असता. तथापि, अनेक तज्ज्ञांना वाटली तितकी एकतर्फी लढत त्याने होऊ दिली नाही एवढेच त्याचे यश. 
 

Web Title: sports news boxing news mayweather record mcgregor