डाग टळला; संकट कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नवी दिल्ली / गोल्ड कोस्ट - भारतीय बॉक्‍सिंग पथकाकडे सीरिंज असल्यामुळे संघावरील कारवाईचे सावट कायम आहे. ऑस्ट्रेलियातून आलेल्या वृत्तानुसार मंगळवारी सकाळी त्रिसदस्यीय समितीचा निर्णय भारतीय बॉक्‍सरचे भवितव्य निश्‍चित करेल; मात्र भारतीय पथकातील कोणीही उत्तेजकांचा वापर केला नसल्याचा दिलेला निर्वाळा हीच भारतीयांसाठी समाधानाची बाब आहे. 

राष्ट्रकुल क्रीडानगरीत सीरिंज सापडल्याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे (सीजीएफ) सीईओ डेव्हिड ग्रेवेमबर्ग यांनी सांगितले; पण त्यांनी भारताचे नाव घेतले नाही. त्या देशाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वैद्यकीय आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले. 

राष्ट्रकुल वैद्यकीय आयोगाने भारतीयांकडून उत्तेजकांचा वापर झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण त्याचवेळी नो सीरिंज पॉलिसीचा भंग झाला आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. 

भारतीयांकडून झालेल्या नियमभंगाबाबत ‘सीजीएफ’ कोर्टसमोर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३०) सुनावणी होईल. संयोजकांनी अजूनही या संदर्भात भारताचे नाव घेतलेले नाही. फेडरेशन कोर्ट सुनावणीनंतरच सर्व काही सांगण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

नो सीरिंज पॉलिसीनुसार क्रीडापटूस गरज असेल, तरच इंजेक्‍शन देण्याची परवानगी दिली जाते; मात्र त्या वेळी वैद्यकीय समितीची परवानगी आवश्‍यक आहे; तसेच या समितीतील पदाधिकाऱ्यांच्या समोरच हे इंजेक्‍शन देणे बंधनकारक आहे. याचाच भंग भारतीयांकडून झाल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

सुरवातीस 
 सीरिंज आम्हाला सापडली
 रस्त्यावर सापडलेली सीरिंज कोणाचीही असू शकते
 वैद्यकीय पथकास सीरिंज दिल्यावर त्यांनी त्या नष्टही केल्या होत्या
 आम्ही एका दक्ष पदाधिकाऱ्याचे काम केले होते

आत्ता 
 आजारी बॉक्‍सरला इंजेक्‍शन दिले
 बॉक्‍सरला व्हिटॅमिनचे इंजेक्‍शन
 सर्व बॉक्‍सरची चाचणी झाली

Web Title: sports news boxing team drugs syringe