आनंदचा कॅरुआनावर विजय

पीटीआय
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

सेंट लुईस (अमेरिका) - भारताच्या ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने सिंक्वेफिल्ड करंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत सोमवारी फॅबिआनो कॅरुआना याचा पराभव केला. पहिल्या चार फेरीत आनंदला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने २९ चालीतच विजय मिळविला. या विजयाने आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आला आहे. मॅक्‍सिम लॅग्रेव ३.५ गुणांसह आघाडीवर असून, आनंद विश्‍वविजेता मॅग्नस कार्लसनसह तीन गुण मिळवून संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. मॅक्‍सिम लाग्रेवला आज लेवॉन अरोनियनने बरोबरीत रोखले, तर कार्लसन याने वेस्ली सो याच्यावर मात केली.

Web Title: sports news chess anand