गोव्याच्या अनुराग म्हामलला ग्रॅंडमास्टर किताब

पीटीआय
गुरुवार, 13 जुलै 2017

पणजी - बुद्धिबळपटू अनुराग म्हामल भारताचा ४८वा, तर गोव्याचा पहिला ग्रॅंडमास्टर बनला आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने आवश्‍यक २५०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी त्याने ग्रॅंडमास्टर किताबाचे पाच नॉर्म प्राप्त केले होते, परंतु २५०० एलो गुणांचा टप्पा न ओलांडल्यामुळे त्याच्या ग्रॅंडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब झाले नव्हते.

स्पेनमधील स्पर्धेपूर्वी अनुरागच्या नावावर २४९८ एलो गुण होते. बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर ४.४ एलो गुणांची कमाई करत २२ वर्षीय अनुरागने २५०० एलो गुणांचा टप्पा पार केला. स्पेनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या २७व्या ओपन द ग्रोस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविताना त्याने २१ एलो गुणांची कमाई केली होती. त्यामुळे त्याचे एलो गुण मानांकन २४९८ झाले होते. बेनास्के आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अनुरागने इंटरनॅशनल मास्टर रोमियो सोरिन मिलू याला हरवून २५०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला. सध्याच्या कामगिरीनुसार त्याचे २५०२ एलो गुण झाले आहेत.

Web Title: sports news chess Anurag Mahamal