बहरलेल्या भारतास इजिप्तची कडवी लढत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - अमेरिकेविरुद्ध सफाईदार विजय संपादलेल्या भारतीय पुरुष संघास जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत दुबळ्या इजिप्तविरुद्ध निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले; तर महिला संघाने इजिप्तचाच कडव्या आव्हानानंतर पराभव केला. 

रशियातील या स्पर्धेत भारतीय संघाने कृष्णन शशिकिरणला ब्रेक दिला. बी. अधिबनने त्याच्यापेक्षा खूपच कमी मानांकन असलेल्या अधम फावझी याला पराजित केले. त्यामुळे भारताने २.५-१.५ असा विजय मिळवला. विदित गुजरातीने प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा घेत बरोबरी साधली; तर कार्तिकेयन मुरली आणि परिमार्जन नेगी डाव बरोबरीत सुटल्यानेच जास्त सुखावले. भारतीय पुरुषांनी या बरोबरीमुळे पाचवे स्थान राखले आहे. त्यांचे ११.५ गुण आहेत; तर आघाडीवरील रशियाचे १४.

महिलांच्या लढतीत द्रोणावली हरिका पराजित झाली; पण तानिया सचदेव, इशा करवडे आणि विजयालक्ष्मीने विजय मिळवत भारताचा ३-१ असा विजय साकारला. काळी मोहरी असलेल्या इशाने डावाच्या अंतिम टप्प्यात प्रभावी खेळ करीत बाजी मारली. भारतीय महिला संघ ११.५ गुणांसह तिसरा आहे; तर आघाडीवरील रशियाचे १२.५ गुण आहेत. भारतीय महिला संघ नक्कीच पदकाच्या शर्यतीत आहे; पण आघाडीवरील रशिया; तसेच ताकदवान चीनविरुद्ध भारताची लढत अद्याप झालेली नाही.

Web Title: sports news chess competition