बिएल बुद्धिबळ स्पर्धेत हरिकृष्णला तिसरा क्रमांक

पीटीआय
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

बिएल (स्वित्झर्लंड) - भारताच्या पी. हरिकृष्णला बिएल बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याची अपराजित मालिका नेमकी अखेरच्या नवव्या फेरीत खंडित झाली. त्यामुळे तो संयुक्त तिसरा आला. अखेरच्या फेरीपूर्वी हरी आणि चीनची होऊ यिफान संयुक्त आघाडीवर होते. हरीच्या पराभवामुळे यिफान विजेती ठरली. तिने स्वित्झर्लंडच्या निको जॉर्जियाडीसवर मात केली. तिचे सर्वाधिक ६.५ गुण झाले. बॅक्रॉटने सहा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. हरी ५.५ गुणांसह तिसरा राहिला. हरीला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा उठविता आला नाही. २९व्या चालीस त्याला पराभव मान्य करावा लागला.

Web Title: sports news chess Harikrishna