जागतिक कार्यक्रमांचा भारतीयांवर ताण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अव्वल खेळाडूंवरील स्पर्धा सहभागाच्या सक्तीवर राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी जोरदार टीका केली. खेळाच्या प्रगतीसाठी अन्य काही उपायही करता आले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मुंबई - जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अव्वल खेळाडूंवरील स्पर्धा सहभागाच्या सक्तीवर राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी जोरदार टीका केली. खेळाच्या प्रगतीसाठी अन्य काही उपायही करता आले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जागतिक बॅडमिंटनचा कार्यक्रम भरगच्च असूनही भारतीयांनी त्यास सामोरे जात चांगली कामगिरी केली आहे. तसेच मानांकनात चांगली प्रगती केली आहे, असे गोपीचंद यांनी सांगितले. जागतिक महासंघाने नवा कार्यक्रम तयार करताना आघाडीच्या खेळाडूंना बारा स्पर्धांत खेळणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर नव्या वर्षात जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आहेत. याचबरोबर भारतीय बॅडमिंटन संघटनेने राष्ट्रीय स्पर्धा सहभागाचीही सक्ती केली आहे. 

स्पर्धा सहभागाची सक्ती चुकीचीच आहे. खेळाडूंना विश्रांतीसही वेळ नाही. स्पर्धा सहभागाची सक्ती करणेच चुकीचे आहे. आपल्या आघाडीच्या खेळाडूंना पूर्वतयारीसही पुरेसा वेळ मिळणार नाही. खेळाच्या प्रगतीसाठीचा हा उपाय नव्हे. खेळाच्या प्रगतीसाठी अन्य उपायही आहेत. आघाडीच्या खेळाडूंवर सक्ती हा उपाय कसा होऊ शकतो, अशी विचारणा गोपीचंद यांनी केली.

साईना नेहवालने तिच्या क्षमतेइतकी कामगिरी करण्यास सुरवात केली आहे. आता तिला तिच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. त्यानंतरच ती सलग खडतर सामन्यांना सामोरे जाऊ शकेल. तिच्या खेळातील काही गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
- गोपीचंद, भारतीय मार्गदर्शक

Web Title: sports news comment by gopichand