राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ चोवीस तास बाकी आहेत. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे या स्पर्धेला बुधवारी (ता. ४) सुरवात होईल. राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजन करणारे गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियातील पाचवे शहर. २०११ मध्ये या शहराला यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ऑस्ट्रेलियातील एक प्राणी कोआला याची निवड करण्यात आली आहे. त्याचे ‘बोरोबी’ असे नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रकुलमध्ये समाविष्ट असणारे बहुतेक देश या स्पर्धेत सहभागी होतील. याचवर्षी ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सराव म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल.

Web Title: sports news common wealth games