चौदा कॉर्नर दवडत भारताची हार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जिंकून हॉकीतील अंतिम यशाचा माउंट एव्हरेस्ट जिंकण्यास सुरवात होईल, असे भारतीय महिला हॉकी संघ सांगत होता, प्रत्यक्षात राष्ट्रकुल क्रीडा हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत दुबळ्या वेल्सविरुद्ध २-३ अशी हार पत्करली. तब्बल चौदा पेनल्टी कॉर्नर दवडल्याचा फटका भारतास बसला.

भारताचा माजी कर्णधार वीरेन रस्किन्हा यांच्या मते संघ मैदानात उतरला, त्या वेळीच त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव जाणवत होता. लढत संपेपर्यंत तो उंचावल्याचे जाणवले नाही. जागतिक क्रमवारीत २६वे असलेल्या वेल्सने आक्रमक सुरवात करीत सातव्याच मिनिटास खाते उघडले. भारताची सदोष नेमबाजी, विस्कळित बचाव, त्यांचा गोलरक्षिका सविताबरोबर नसलेला सुसंवाद याचबरोबर बचावफळी आणि मध्यरक्षकात नसलेल्या समन्वयाचा भारतास फटका बसला. 

पहिल्या दोन सत्रांत दोन गोल स्वीकारल्यानंतर राणीने तिसऱ्या सत्रात सात मिनिटांच्या अंतराने गोल केले खरे; पण या सत्रात भारताने आठ पेनल्टी कॉर्नर दवडले. भारताने संपूर्ण सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळवले; पण त्यापैकी एकावरच गोल केला. आधुनिक हॉकीत ड्‌ग्रॅ फ्लिकर लढतीचा निर्णय करतात. रामपाल आणि गुरजित कौर यात अपयशीच ठरल्या. पेनल्टी कॉर्नरवर जमिनीलगत ताकदवान हिट मारण्याव्यक्तिरिक्त क्वचितच वेगळे प्रयोग दिसले. आता त्यातही पूनम राणीने व्हॅरिएशनवर केलेला गोल वेल्सने टीव्ही पंचांची मदत घेत नाकारण्यात यश मिळविले. 

Web Title: sports news common wealth games hockey competition