इतिहास आणि संस्कृतीचा मिलाफ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

२१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - कलाकारांच्या अदकारीबरोबरच मुसळधार पावसानेही २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात अनोखे रंग भरले. उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या कलाकारांनी सादर केलेल्या वंश आणि स्थानिक परंपरेच्या प्रदर्शनाने उपस्थितांना इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ बघायला मिळाला. 

ऑस्ट्रेलियाच्या मूळनिवासांचे ठिकाण या मध्यावर्ती कल्पनेभोवती संपूर्ण उद्‌घाटन सोहळा आधारलेला होता. पावसापासून संयोजकांची सुटका झाली नाही. पाऊस कोसळत असतानाही कलाकारांनी आपल्या धमाल प्रदर्शनाने प्रेक्षकांना दोन तास खुर्चीला खिळवूनच ठेवले नाही, तर एक वेळ त्यांना संगीतावर तालही धरायला लावले. ‘हॅलो अर्थ’ असा संदेश देणाऱ्या गीताने निळ्या रंगात झालेल्या आतषबाजीने या उद्‌घाटन सोहळ्याची सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री डेल्टा गुड्रेम हिने हे गीत सादर केले. त्यानंतर स्थानिक कलाकारांच्या अनिभय. नृत्य आणि संगीत आविष्काराने उद्‌घाटन सोहळा रंगत गेला.

अनेक अडथळे पार करून बॅटन सर्वांत शेवटी अडथळ्याच्या शर्यतीची सम्राज्ञी सॅली पिअर्सन हिने स्वीकारले आणि प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर  त्यांनी स्पर्धेचे उद्‌घाटन झाल्याचे जाहीर केले.

उद्‌घाटन सोहळ्यात
    प्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला पार्कर यांच्यासह ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तींची उपस्थित लक्षणीय. 
    तब्बल ३५ हजार प्रेक्षक छत्र्या घेऊन अखेरपर्यंत उपस्थित
    भारतीय पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूने केले
    सर्व भारतीय खेळाडूंचा प्रथमच ट्राऊझर्स आणि ब्लेझर्स असा पोषाख
    संचलनात सर्वप्रथम गेल्या स्पर्धेचे यजमान स्कॉटलंडचे, तर शेवट यंदाच्या यजमान ऑस्ट्रेलियाचे संचलन
    सर्व ७१ राष्ट्रकुल समूहातील देशांचा सहभाग

Web Title: sports news common wealth games inauguration program