नेतृत्व गटाची कल्पना कोणाची?

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

केप टाउन - चेंडू कुरतडल्याप्रकरणी गेलेली प्रतिष्ठा जपण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने झाल्या प्रकाराच्या चौकशीस तातडीने सुरवात केली आहे. ‘नेतृत्व गट’ स्थापण्याची कल्पना कुणाची? इथपासून त्यांनी आपल्या चौकशीस सुरवात केल्याचे समजते.

केप टाउन - चेंडू कुरतडल्याप्रकरणी गेलेली प्रतिष्ठा जपण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने झाल्या प्रकाराच्या चौकशीस तातडीने सुरवात केली आहे. ‘नेतृत्व गट’ स्थापण्याची कल्पना कुणाची? इथपासून त्यांनी आपल्या चौकशीस सुरवात केल्याचे समजते.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या समितीमधील ऑस्ट्रेलियाच्या एकात्मता समितीचे प्रमुख इयान रॉय आणि हाय परफॉर्मन्स व्यवस्थापक पॅट होवर्ड या सदस्यांनी येथे दाखल झाल्या झाल्या आपल्या चौकशीस सुरवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला आहे तेथेच हे चौकशीचे काम सुरू आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जोहान्सबर्गला रवाना होणार होता; मात्र संघाला हॉटेलमध्येच थांबवून ठेवण्यात आले आहे. 

चेंडू कुरतडल्याची कबुली देताना स्मिथने उपाहाराच्या विश्रांतीला वरिष्ठ खेळाडूंचा एक गट स्थापन करून या प्रकरणाचे नियोजन केले होते. या गटाला त्याने ‘नेतृत्व गट’ असे नाव दिले होते. आता हाच गट स्थापन करण्याची कुणाची कल्पना होती इथपासून समितीने चौकशीस सुरवात केली आहे. स्मिथने त्या वेळी या गटातील सहभागी खेळाडूंची नावे सांगण्यास नकार दिला होता. चौकशी समिती प्रशिक्षक डॅरेन लिमन यांनाही चौकशीस बोलावणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या जनतेला उत्तर हवे आहे. आम्ही त्यासाठी बांधील आहोत; पण थोडा धीर धरा. चौकशी सुरू आहे. बुधवार सकाळपर्यंत तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील.
डेव्हिड पीवेर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष

Web Title: sports news cricket austalia