रॉयच्या विक्रमी खेळीने इंग्लंडचा विजय

पीटीआय
सोमवार, 15 जानेवारी 2018

मेलबर्न - ‘ॲशेस’ मालिकेतील पराभवाचे शल्य बाजूला ठेवत सलामीचा फलंदाज जेसन रॉयच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३०४ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने विशेषतः जेसन रॉयने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हतबल झाले. इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमधील वैयक्तिक १८० धावांची खेळी करून जेसन रॉयने इंग्लंडला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आणले. त्याला रुटची साथ मिळाली. इंग्लंडने ४८.५ षटकांत ५ बाद ३०८ धावा केल्या.

फिंच, मिशेल मार्श आणि मार्क्‌स स्टोईनिस यांच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान उभे राहिले होते. या तिघांना ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनी साथ केली. 

कसोटीत मार खाल्लेल्या इंग्लंडला हे आव्हान सोपे नव्हते. मात्र, रॉयच्या बिनधास्त फलंदाजीने ते शक्‍य झाले. जॉनी बेअरस्टॉ आणि ॲलेक्‍स हेल्स झटपट बाद झाल्यानंतर इंग्लंड ५.५ षटकांत २ बाद ६० असे अडचणीत आले होते. त्या वेळी रॉयने दोन विक्रम मोडीत काढत इंग्लंडचा विजय साकार केला. त्याने १५१ चेंडूत १८० धावा करताना इंग्लंडकडून वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली. यापूर्वी ॲलेक्‍स हेल्सची १७१ धावांची खेळी केली होती. याच शतकी खेळीत रॉयन रुटच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी २२१ धावांची भागीदारी केली. त्यांनी नील फेअरब्रदर आणि ग्रॅमी हिक यांच्या १९९१ मधील २१३ धावांच्या भागीदारीचा विक्रम मागे टाकला.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ८ बाद ३०४ (ॲरॉन फिंच १०७ -११९ चेंडू १० चौकार, ३ षटकार, मार्क्‍स स्टोईनिस ६०, मिशेल मार्श ५०, लियाम प्लंकेट ३-७१, आदिल रशिद २-७३) पराभूत वि. इंग्लंड ४८.५ षटकांत ५ बाद ३०८ (जेसन रॉय १८० -१५१ चेंडू, १६ चौकार, ५ षटकार, ज्यो रुट ९१ -११० चेंडू, ५ चौकार, मिशेल स्टार्क २-७१, पॅट कमिन्स २-६३)

Web Title: sports news cricket australia england