बीसीसीआयच्या चौकशीत शमी निर्दोष

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई, ता. २२ ः पत्नीने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या वेगवान गोलंदाज महंमद शमीला थोडासा दिलासा मिळाला आहे. मॅच फिक्‍सिंगसंदर्भात बीसीसीआयने केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीच्या चौकशीत तो निर्दोष ठरला. त्यामुळे वेतनश्रेणीच्या ‘ब’ गटात त्याचा समावेश करण्यात आला. पर्यायाने आयपीएल खेळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. 
शमीची पत्नी हसिन जहानने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार, खुनाचा प्रयत्न असे एकापेक्षा एक गंभीर आरोप करताना त्याचे फिक्‍सरशी संबंध असून मॅच फिक्‍सिंग केल्याचेही तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे शमीचा वेतनश्रेणीतील समावेश रोखून धरण्यात आला होता.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने फिक्‍सिंगच्या आरोपांची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे प्रमुख नीरज कुमार यांना चौकशी करण्याच्या सूचना केल्या. जहानने शमी दुबईत गेला असल्याचे आणि महंमदभाई या व्यक्तीबरोबर फिक्‍सिंग केल्याचे काही पुरावे असल्याचे सांगितले होते. या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून नीरज कुमार यांनी प्रशासकीय समितीकडे अहवाल सादर केला. त्यात शमीवर पुढे कारवाई करण्याची आवश्‍यकता नसल्याचा उल्लेख केला. त्यामुळे शमीचा ‘ब’ श्रेणीत समावेश करण्यात आला. त्याला वर्षासाठी तीन कोटी रुपये मिळतील. याच अहवालावर शमीचा आयपीएल सहभागही ठरणार होता. आता तो दिल्लीच्या संघातून मैदानात उतरेल.

Web Title: sports news cricket Mohammed Shami flawless in BCCI inquiry