‘वॉकी-टॉकी’च्या वापराबाबत विराट कोहलीला ‘क्‍लीन चिट’

‘वॉकी-टॉकी’च्या वापराबाबत विराट कोहलीला ‘क्‍लीन चिट’

नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीची ‘वॉकी टॉकी’ वापराची कृती आक्षेपार्ह नसल्याचा निर्वाळा गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केला.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना सीमारेषेपलीकडे असलेल्या ‘डग आऊट’मधून कोहली ‘वॉकी टॉकी’वरून बोलत असल्याचे दाखविण्यात आले होते. तेव्हा कोहलीची ही कृती वादग्रस्त ठरणार अशी चर्चा होती. ‘वॉकी टॉकी’चा उपयोग करून कोहली काय बोलत होता हे अद्याप समजू शकले नसले, तरी त्याने त्याचा वापर करण्यापूर्वी प्रशासन आणि ‘बीसीसीआय’च्या लाचलुचपत विरोधी पथकाची परवानगी मागितली होती, हे स्पष्ट झाल्यामुळे ‘आयसीसी’ने त्याला ‘क्‍लीन चिट’ दिली.

काय आहे आयसीसीचा नियम
आयसीसीच्या नियम ४.२ नुसार सामना सुरू असताना लॅपटॉप, इंटरनेट, लॅंडलाइन फोन अशा उपकरणांचा प्रयोग करण्यास खेळाडूंवर निर्बंध आहेत. त्यामुळेच कोहलीची कृती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीने विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन कोहलीला त्याच्या वापराची परवानगी दिली होती. त्याने आयसीसी निरीक्षकांच्या परवानगीशिवाय त्याचा उपयोग केला असता, तर मात्र कोहली अडचणी आला असता आणि त्याच्यावर कारवाई झाली असती.

म्हणून परवानगी
टी-२० सामन्यात खेळाडू खाली ‘डग आऊट’मध्ये बसतात. त्यामुळे ड्रेसिंगरूममध्ये सूचना देण्यासाठी कोहलीकडून याचा वापर केल्याचे समोर येत आहे. कोटला मैदानाची ड्रेसिंगरूम दुसऱ्या मजल्यावर असल्याने कोहलीला ही परावनगी मिळाली असावी, अशी चर्चा आहे. मात्र, अजूनही कोहलीने त्याचा उपयोग कशासाठी केला याबाबत ‘बीसीसीआय’ किंवा ‘आयसीसी’ने कसलाही खुलासा केलेला नाही. मात्र, त्याला ‘क्‍लीन चिट’ दिली इतकेच समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com