उष्ण वातावरण सायकलपटूंना पोषकच... 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - उन्हाच्या झळा वाढत असतानाच त्याच कालावधीत मुंबई- पुणे सायकल शर्यत होणार आहे. कडक उन्हात शर्यत झाल्यास त्याचा स्पर्धकांना एकप्रकारे फायदाच होतो. सायकलिंग करताना शरीर गरम होते, ते उष्ण वातावरणाशी थंड वातावरणाच्या तुलनेत चटकन जुळवून घेते, असा दावा करीत संयोजकांनी या कालावधीत संयोजनाचे समर्थन केले. 

मुंबई-पुणे सायकल शर्यतीस उज्ज्वल परंपरा आहे. मात्र प्रॉमिसचा पुरस्कार बंद पडल्यावर बंद झालेल्या या शर्यतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, पण ही शर्यत आता नव्या स्वरूपात होईल. आता ही शर्यत मुंबई ते खंडाळा आणि खंडाळा ते पुणे या दोन टप्प्यात होईल. या दोन्ही टप्प्यांची वेळ एकत्र करून विजेता घोषित करण्यात येणार आहे. पनवेल, खोपोली, तसेच भोर घाट प्रथम पार करणाऱ्यास खास बक्षीस असेल. 

क्रीडा जागृती, राज्य सायकलिंग संघटनेने घेतलेल्या या स्पर्धेस स्टारकेनचा पुरस्कार लाभला आहे. त्यांनी पाच वर्षांसाठी पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत सहभागाच्या सर्व अटी पूर्ण केलेल्या १३७ स्पर्धकांत शंभरहून जास्त स्पर्धक महाराष्ट्राबाहेरील आहेत. त्यांना एकंदर सव्वासहा लाखांची बक्षिसे देण्यात येतील.  बहुतेक सर्व स्पर्धक मंगळवारी होणाऱ्या सातारा-महाबळेश्‍वर-सातारा या शर्यतीतही सहभागी होणार आहेत.

Web Title: sports news Cyclist warm atmosphere