लहरी हवामानात कोल्हापूरचा ध्रुव जिगरी

मुकुंद पोतदार
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

आशावादी आईचे प्रोत्साहन
शनिवारी प्रतिस्पर्ध्याच्या कारची धडक बसल्यामुळे ध्रुवची संधी हुकलीच, शिवाय रविवारी पहिली शर्यत त्याला शेवटून दुसऱ्या क्रमांकावरून सुरू करावी लागली. शनिवारी सायंकाळी त्याने क्रॅशचा व्हिडिओ पाहून हे टाळण्यासाठी काय करायला हवे होते याचा अंदाज घेतला. त्या वेळी आई मोनिका यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांचा आशावाद ध्रुवसाठी प्रेरणादायी ठरला.

श्रीपेरंबुदूर - कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने टुरिंग कार मालिकेतील पदार्पणाच्या मोसमाची सांगता प्रारंभाप्रमाणेच दमदार केली. त्याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या अखेरच्या दहाव्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविला. त्याने दुसऱ्या फेरीत एक शर्यत जिंकली होती. रविवारी पहिल्या शर्यतीच्या वेळी पाऊस, तर दुसऱ्या शर्यतीच्या वेळी कडक ऊन असे लहरी हवामान असताना ध्रुवने जिगरी कौशल्य प्रदर्शित केले.

मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर शनिवारी ध्रुवला प्रतिस्पर्ध्याच्या कारची धडक बसल्यामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे पहिली शर्यत त्याला नव्या क्रमांकावरून सुरू करावी लागली. यानंतरही त्याने चौथ्या क्रमांकापर्यंत घोडदौड केली. ही शर्यत मूळ कार्यक्रमानुसार दुसरी होणार होती, पण आदल्या रात्री पावसामुळे ट्रॅक ओला झाला होता. फोक्‍सवॅगन रेसिंग तंत्रज्ञांनी मिनिटांत कारला वेट टायर्स लावली. ध्रुव कारकिर्दीत प्रथमच टुरिंग कार वेट टायर असताना चालवीत होता. त्याने फेरीगणिक क्रमांक उंचावला. त्याचा तिसरा क्रमांक थोडक्‍यात हुकला; पण क्रमांक प्रगती कौतुकाचा विषय ठरली. मग दुसऱ्या शर्यतीत त्याने पाचव्या क्रमांकावरून सुरवात करताना तिसरा क्रमांक पटकावला. दिल्लीच्या करमिंदरपाल सिंगने ( गुण) चौथ्या मोसमात विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण केले.

ध्रुव एकुण क्रमवारीत तिसरा आला. त्याने पहिल्या मोसमात पाच करंडक जिंकले. यात एक शर्यत जिंकून त्याने क्षमतेची चुणूक दाखविली. अखेरच्या शर्यतीत त्याने पोलो करंडक विजेत्या संदीप कुमार याच्यासारख्या अनुभवी ड्रायव्हरला मागे टाकले. एकूण क्रमवारीत मात्र संदीप दुसरा आला. त्याचे, तर ध्रुवचे  गुण झाले. मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने गुणांसह चौथे स्थान मिळविले.

ध्रुवने सांगितले, की कारकिर्दीची सुरवात गोकार्टिंगने केल्यानंतर मी काहीसा उशिरा टुरिंग कारकडे वळलो. सुरवातीपासून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला. तो उपयुक्त ठरला.

Web Title: sports news dhruv mohite win touring car racing