जोकोविच, नदालची विजयी सलामी

पीटीआय
मंगळवार, 30 मे 2017

पॅरिस - नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या संभाव्य विजेत्यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेत्या जोकोविचने ‘सुपर कोच’ आंद्रे अगासी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या युगाचा यशस्वी प्रारंभ केला.

जोकोविचने स्पेनचा ‘क्‍ले कोर्ट स्पेशालीस्ट’ मार्सेल ग्रॅनोलर्स याच्यावर ६-३, ६-४, ६-२ अशी मात केली. दहाव्या विजेतेपदाचे ‘मिशन’ सुरू केलेल्या नदालने फ्रान्सच्या बेनॉईट पैरेला ६-१, ६-४, ६-१ असे हरविले.

मुगुरुझा विजयी
गतविजेत्या गार्बीन मुगुरुझाने धोकादायक प्रतिस्पर्ध्याचा लौकिक असलेल्या इटलीच्या फ्रान्सिस्का शियावोनीचे आव्हान ६-२, ६-४ असे परतवून लावले. ३७ वर्षांची शियावोनी या स्पर्धेत कारकिर्दीत अखेरच्या वेळी सहभागी झाली होती. यंदाच्या मोसमाअखेर निवृत्त होणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. मुगुरुझाने गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सला हरवून विजेतेपद मिळविले होते; पण यंदा तिचा फॉर्म हरपला आहे. ‘टॉप टेन’मध्ये राहण्यासाठी तिला अंतिम फेरी गाठणे अनिवार्य आहे.

वॉझ्नियाकीला झुंजविले
डेन्मार्कच्या कॅरोलीन वॉझ्नियाकीला १७ वर्षांच्या जैमी फौर्लीसने तीन सेटपर्यंत झुंजविले. जैमी ३३७व्या क्रमांकावर असून तिला ‘वाईल्ड कार्ड’द्वारे प्रवेश मिळाला होता. तिची ही दुसरीच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा होती. वॉझ्नियाकीला ११वे मानांकन होते. पहिला सेट जिंकल्यानंतर ती १-४ अशी मागे पडली होती. जैमीने सर्व्हिसवर तीनपैकी दोन मॅचपॉइंट वाचविले. अखेर वॉझ्नियाकीने ६-४, ३-६, ६-२ असा विजय मिळविला. सामन्यानंतर मात्र सर्वाधिक टाळ्या जैमीला मिळाल्या.

इतर प्रमुख निकाल
पुरुष एकेरी ः मिलॉस राओनीच (कॅनडा ५) विवि स्टीव डार्सीस (बेल्जियम) ६-३, ६-४, ६-२. निकोलोझ बॅसिलॅश्विली (जॉर्जिया) विवि गिल्लेस सायमन (फ्रान्स ३१) १-६, ६-२, ६-४, ६-१. डेव्हिड गॉफीन (बेल्जियम १०) विवि पॉर-हेन्री मॅथ्यू (फअरान्स) ६-२, ६-२, ६-२. यिरी वेसेली (चेक) विवि जॅक सॉक (अमेरिका १४) ७-५, ७-५, ६-३.

महिला एकेरी ः किकी बर्टेन्स (नेदरलॅंड्‌स १८) विवि ॲला टॉम्लायानोविच (ऑस्ट्रेलिया) ४-६, ६-१, ६-१. एलिसी मेर्टेन्स (बेल्जियम) विवि डॅरीया गाव्रीलोवा (ऑस्ट्रेलिया २४) ७-६ (७-४), १-६, ६-४. ॲनेट काँटावेईट (इस्टोनिया) विवि मोनिका निकूलेस्क्‍यू (रुमानिया) ७-५, ६-१.

Web Title: sports news Djokovic, Nadal's win