थिएमचा जोकोविचला धक्का

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

पॅरिस - माजी विजेता रॅफेल नदाल सहजगत्या उपांत्य फेरी गाठत असतानाच दुसरीकडे यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या नोव्हाक जोकोविचला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने गतविजेत्याला सरळ तीन सेटमध्ये पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. 

सहाव्या मानांकित थिएमने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचला ७-६(७-५), ६-३, ६-० असे पराभूत केले. जोकोविचला गेल्या सात वर्षांत प्रथमच उपांत्य फेरीपूर्वी आपले आव्हान गमवावे लागले. थिएमची गाठ आता रॅफेल नदालशी पडणार आहे. 

थिएमने पहिला सेट ७३ मिनिटांत जिंकला. त्यावेळ टायब्रेकमध्ये जोकोविचचा फटका नेटमध्ये अडकला. दुसऱ्या सेटमध्ये तो थिएमच्या अचूकतेपुढे ०-३ असा मागे पडला होता. त्यानंतर थंड आणि जोराने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करत थिएमने दुसरा सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये आश्‍चर्य घडले. थिएमने नवव्या गेमलाच वीस मिनिटांत सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. या सेटमध्ये जोकोविचला केवळ आठ गुण मिळवता आले. 

नदालला ‘बाय’
दहाव्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या नदालला विजयासाठी कष्ट पडले नाही. त्याला कॅरेनो बुस्टा याने दुखापतीमुळे पुढे चाल दिली. पोटाच्या विकारामुळे कॅरेनो याने लढत सोडून दिली, तेव्हा नदाल ६-२, ३-० असा पुढे होता.

बॅसिन्झकी, ओस्टापेन्कोचा विजय
महिला एकेरीत तिमेआ बॅसिन्झकी आणि लॅटवियाची १९ वर्षीय जेलेना ओस्टापेन्को यांनी पावसाच्या सततच्या व्यत्ययाने लांबलेल्या लढतीत आकर्षक विजय मिळवून महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. बॅसिन्झकी हिने क्रिस्तिना मिआडेनोविच हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला. त्याचवेळी १९ वर्षीय ओस्टापेन्को हिने कॅरोलिन वॉझ्नियाकी हिचे तेवढेच ताकदवान आव्हान ४-६, ६-२, ६-२ असे परतवून लावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढती दोघींनी दोन तासांत जिंकल्या. मात्र, पावसाच्या सातत्यामुळे दोन्ही लढती तब्बल सहा तासांनी संपल्या. ओस्टापेन्को ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी पहिली लॅटवियन टेनिसपटू ठरली. 

हालेप, प्लिस्कोवा उपांत्य फेरीत
महिला एकेरीत माजी उपविजेत्या सिमोना हालेप हिने उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत तिला एलिना स्विटोलिनाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. तिने लढत ३-६, ७-६(८-६), ६-० अशी जिंकली. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिने प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत अखेरच्या चार खेळाडूंत स्थान मिळवताना आपल्याच देशवासीय कॅरोलिन गार्सिया हिचा ७-६(७-३), ६-४ असा पराभव केला.

Web Title: sports news Djokovic tennis