इंग्लंडचा क्रिकेटपटू पीटरसन निवृत्त 

पीटीआय
रविवार, 18 मार्च 2018

नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी कसोटीपटू केव्हीन पीटरसन याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बूट्‌स अप, थॅंक यू, असे ट्‌विट करीत त्याने हा निर्णय जाहीर केला. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेट्टा ग्लॅडीएटर्सकडून खेळला. या संघाने चौथ्या क्रमांकासह प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला; पण प्ले-ऑफ लढती पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तेथे सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये पीटरसनचा समावेश आहे. 

कारकीर्द ः 104 कसोटींमध्ये 47.28च्या सरासरीने 8181 धावा. 23 शतके, 35 अर्धशतके. 136 वन-डे सामन्यांत नऊ शतकांसह 4440 धावा. 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1176 धावा. 2010 मधील इंग्लंडच्या टी-20 विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू. 

Web Title: sports news England cricketer Pietersen retired