अनुभवी फर्नांडो व्हेर्डास्कोचा तिसऱ्या मानांकित दिमित्राववर विजय

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

इंडियन वेल्स - स्पेनच्या अनुभवी फर्नांडो व्हेर्डास्को याने आपल्या ताकदवान सर्व्हिसच्या  जोरावर इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सनसनाटी निकालाची नोंद केली. त्याने तिसऱ्या मानांकित ग्रिगॉर दिमित्रावचा ७-६(७-४), ४-६, ६-३ असा पराभव केला.

व्हेर्डास्कोने कारकिर्दीत दुसऱ्यांदाच दिमित्राववर विजय मिळविला. त्याने १२ बिनतोड सर्व्हिस केल्या. यातील सहा सर्व्हिस या निर्णायक तिसऱ्या सेटमधील होत्या. पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएमने ग्रीकच्या युवा स्टेफॅनोस सिट्‌सीपास याचे आव्हान ६-२, ३-६, ६-३ असे मोडून काढले. केविन अँडरसन, फॅबिओ फॉग्निनी, अल्बर्ट रामोर विनोलास यांनीही विजय मिळविले.

Web Title: sports news Fernando Verdasco tennis