जपान, ऑस्ट्रेलियाची आगेकूच

मुकुंद धस
मंगळवार, 25 जुलै 2017

बंगळूर - गतविजेत्या जपान आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघांनी आपापले सामने जिंकून बंगळूर येथे सुरू असलेल्या फिबा आशिया कप महिला बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयांची नोंद केली. 

बंगळूर - गतविजेत्या जपान आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघांनी आपापले सामने जिंकून बंगळूर येथे सुरू असलेल्या फिबा आशिया कप महिला बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयांची नोंद केली. 

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने दुबळ्या फिलिपिन्सचा १०७-६५ असा सहज  धुव्वा उडवला. गतविजेत्या जपानने कोरियाला ७०-५६ असे पराभूत केले. पण, त्यासाठी जपानला बराच संघर्ष करावा लागला. पहिल्या सत्रात कोरियाने ९-४ अशी आघाडी घेऊन सुरवात चांगली केली. मात्र, नागावका मोइको आणि मियाझावा युकी यांनी लागोपाठ ३ गुणांचे बास्केट नोंदवत जपानला १०-९ अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लिम युंग हुई ने सुरेख हुलकावणी देत संरक्षित क्षेत्रात घुसून बास्केट केला आणि किम दानबी ने शेवटच्या क्षणी मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन ३ गुणांचा बास्केट नोंदवून पहिल्या सत्रा अखेर कोरियाला १४-१२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र अत्यंत वेगवान चाली रचणाऱ्या जपानच्या खेळाडूंनी सामन्यावर संपूर्ण वर्चस्व राखले. भक्कम बचावामुळे जपानने मध्यांतरास ३८-२१ अशी निर्णायक आघाडी घेतली. उत्तरार्धात कोरियानेसुद्धा वेगवान आक्रमण करण्याचा प्रयत्न करून पहिला, परंतु जपानच्या भक्कम बचावापुढे त्यांची डाळ शिजली नाही. 

अन्य सामन्यात चीनने तैवानचा १०२-६३ असा पराभव केला. न्यूझीलंडने उत्तर कोरियाचे आव्हान ७१-५० असे परतवून लावले. उत्तर कोरियाचा हा दुसरा पराभव होता. भारतीय महिलांना आज विश्रांती होती. त्यांची उद्या श्रीलंकेशी लढत होणार आहे.

Web Title: sports news fiba asia cup women basketball competition