मालीच्या आव्हानासाठी स्पेन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - जागतिक फुटबॉलमध्ये स्पेन आणि माली यांच्या क्षमतेची स्पर्धाच होत नाही; पण विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत गतउपविजेत्या मालीच्या आव्हानाचा सामना करण्याची पूर्वतयारीच स्पेन करीत आहे. भारतातील हवामानाशी चटकन जुळलेला माली ताकदवान असल्याची कबुलीच स्पेन देत होते. 

आम्ही भारतातील वातावरणाशी आता चांगले जुळवून घेतले आहे. पहिल्या सामन्याच्या तुलनेत अंतिम टप्प्यात आता आमचे खेळाडू कमी थकत आहेत. मालीचे खेळाडू आमच्या खेळाडूंपेक्षा ताकदवान आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिआक्रमणावर भर देण्यापेक्षा आम्ही आमच्याच पद्धतीने खेळ करणार, त्यांनाही आमच्याविरुद्ध प्रतिआक्रमण सोपे नसेल, असे स्पेन मार्गदर्शक सॅंती देनिया यांनी सांगितले. 

मालीसाठी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम नवीन नाही. त्यांना चाहत्यांचे चांगलेच प्रोत्साहनही लाभले आहे. भारतात सर्वत्र आमचे उत्स्फूर्त स्वागत झाले आहे. नवी मुंबईही यास अपवाद नसेल. भारतात चांगल्या खेळाचे कौतुक होते, हा आमचा अनुभव आहे. नवी मुंबईकरही आमची निराशा करणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: sports news FIFA football Spain