बायर्न म्युनिकची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

पीटीआय
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

ग्लासगो - यावी मार्टिनेझ याने अखेरच्या टप्प्यात नोंदविलेल्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिकने सलग दहाव्या वर्षी चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बायर्नने ‘ब’ गटातील सामन्यात सेल्टिकचा २-१ असा पराभव केला. 

जर्मनीच्या बायर्न म्युनिक संघाचे सेल्टिकच्या बचावफळीतील ढिलाईचा अचूक फायदा उठवून २२व्या मिनिटाला आघाडी मिळविली. किंग्सले कोमन याने हा गोल नोंदवला. विश्रांतीला बायर्नने याच गोलच्या जोरावर आघाडी राखली.

उत्तरार्धात अखेरच्या टप्प्यात सामन्याच्या ७४व्या मिनिटाला कॅलम मॅग्रेगॉरने गोल करून सेल्टिकला बरोबरीवर आणले. पण, त्यांचा हा आनदं फार काळ टिकला नाही, बरोबरी साधल्यानंतर दोनच मिनिटांनी त्यांना दुसरा गोल  स्विकारावा लागला. मार्टिनेझने या वेळी हेडरद्वारे बायर्नच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले. 

ॲटलेटिको संकटात
माद्रिद - क्वाराबाग संघाने १-१ असे बरोबरीत रोखल्यामुळे ॲटलेटिको माद्रिद संघाचे आव्हान संकटात आले आहे. ॲटलेटिकोला आता आपले आव्हान राखयाचे असेल, तर रोमा आणि चेल्सी या संघांबरोबर रहिलेले ‘सी’ गटातील अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील. मायकेलने हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे विश्रांतीपूर्वी पाच मिनिटे आधी ॲटलेटिकोला आघाडीवर नेले. उत्तरार्धाच्या ११ व्या मिनिटाला थॉसम पेरी याने क्वाराबाग संघाला सनसनाटी बरोबरी मिळवून दिली. 

पीएसजी बाद फेरीत
पॅरिस - डावीकडून खेळणाऱ्या लेविन कुर्झावा याने अनपेक्षित केलेल्या हॅटट्रिकने पॅरिस सेंट जर्मन संघाने बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित केला. त्यांनी अँडरलेच्‌ट संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. 

मार्को आणि नेमार यांनी पूर्वार्धात प्रत्येकी एकेक गोल करून ‘पीएसजी’ला आघाडीवर नेले. त्यानंतर उत्तरार्धात कुर्झावा याने एकामागून एक असे तीन गोल करून संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाने ‘पीएसजी’ने गटातून बायर्नपाठोपाठ बाद फेरीत प्रवेश केला.

अन्य निकाल -
बासेल पराभूत वि. सीएसकेए मोस्कवा १-२, मॅचेस्टर युनायटेड वि.वि. बेनफिका २-०, ऑलिंपियाकोस पिराएयूस बरोबरी वि. बार्सिलोना ०-०, रोमा वि.वि. चेल्सी ३-०, स्पोर्टिंग सीपी बरोराबी वि युव्हेंटस १-१.

Web Title: sports news football