फुटबॉल सरावातही बोल्टचा बोलबाला

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

डॉर्टमुंड (जर्मनी) - जमैकाचा निवृत्त झालेला विश्वविक्रमी धावपटू उसेन बोल्ट याने फुटबॉल कारकीर्द घडविण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. शुक्रवारी त्याने बोरुशिया डॉर्टमुंड एफसीच्या खेळाडूंसह सराव केला. त्या वेळी त्याला पाहण्यासाठी सुमारे दीड हजार चाहते आले होते. बोल्टने प्रतिस्पर्ध्याच्या पायातून चेंडू काढण्यासह हेडिंगवर गोलही नोंदवत त्यांना खुश केले.

बोल्टने सकाळच्या सत्रात सराव केला तेव्हा डझनभर पत्रकार आणि छायाचित्रकारही सज्ज होते. मारिओ गॉत्झे, ज्युलीयन वैग्‌ल यांच्या साथीत बोल्ट मैदानावर उतरला. त्यापूर्वी त्याने वॉर्मअप केले. तेव्हा बोचरी थंडी असूनही अनेक चाहत्यांनी जमैकाचा ध्वज झळकाविला. डॉर्टमुंडचे मुख्य प्रशिक्षक पीटर स्टोजर म्हणाले, की उच्च दर्जाचा फुटबॉलपटू बनण्यासाठी बोल्टला बरीच मेहनत करण्याची गरज आहे.

Web Title: sports news football Bolt